Share

महाराष्ट्राची चिंता वाढली ; पुरंदर तालुक्यात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

सासवड : कोरोना विषाणूच्या नव-नवीन व्हेरियंटमुळे देशातील बर्‍याच राज्यांची चिंता वाढली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशातच आता एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे धोकादायक झिका व्हायरसचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे.बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा रुग्ण आढळला आहे.

बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका व्हायरसची लागण झाल्याचं 30 जुलै रोजी समोर आलं. या महिलेला चिकनगुनिया देखील झाल्याचं समोर आलं होतं.त्यानंतर 31 जुलै रोजी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकानं बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.हा झिका रुग्ण सध्या पूर्णपणे बरा झाला असून या महिलेस कोणतीही लक्षणं नाहीत, तसंच त्यांच्या घरात कुणालाही लक्षणं नाहीत, असंही सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

काय आहे झिका आजार?

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार आहे.
झिका आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.
इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!