मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडलाय.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आदी मंत्री व नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचं भरभरून कौतुक केलं आहे. आदित्यजी…त्यावेळी तुमचं नाव सुवर्ण अक्षरात लिहावं लागेल, असे उद्गार सतेज पाटील यांनी काढले आहेत.
‘बऱ्याच वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. तांत्रिक अडचणीतून या प्रकल्पाचा सुटका कधी होणार याची उत्सुकता इथल्या सामान्य रहिवाशांना होती. पण, ज्यांच्या हाती लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व दिलं, त्या आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी वर्षभरात ५० बैठका तरी घेतल्या असतील. हा प्रकल्प सुरू व्हावा, लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी भूमिका त्यांनी घेतली,’ असं पाटील म्हणाले.
यासोबतच, ‘प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारा असावा लागतो. सुदैवाने आदित्य ठाकरे यांच्या रुपाने या प्रकल्पाला पाठपुरावा करणारी व्यक्ती भेटली. देशासाठी मुंबई ड्रीम सिटी आहे. रोजगारासाठी लोक या स्वप्ननगरीत आले. पहिल्या पिढीचं स्वप्न रोजगार होतं. माझ्या पिढीचं स्वप्न हक्काचं घरं आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका महाविकास आघाडीचं सरकार करत आहे,’ असं देखील पाटील म्हणाले.
‘कोविडचं संकटात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’च्या माध्यमातून राज्य कोविड मुक्त करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता माझं कुटुंब, माझं घर अशी भूमिका मुख्यमंत्री आणि सरकारला घ्यावी लागेल. आता हा महत्त्वकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. येणाऱ्या काही वर्षांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्वांच्या हस्ते चावी देण्याचा कार्यक्रम आम्ही करू. या खात्याचा मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी पुढाकार घेतला. हा प्रकल्प होण्यात सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी या प्रकल्पाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी आदित्यजी, तुमचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागेल,’ असं तोंडभरून कौतुक काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरेंनी भूमिपूजन केलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची वर्क ऑर्डर आमच्या सरकारच्या काळातील’
- आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही – देवेंद्र फडणवीस
- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय; छगन भुजबळ आक्रमक
- उद्धव ठाकरे यांनी जागवल्या बीडीडी चाळीतील आठवणी, म्हणाले…
- महाराष्ट्राची चिंता वाढली ; पुरंदर तालुक्यात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

