Share

अनिल परब यांना शंभर कोटी मिळाले तरच एसटीचे विलीनीकरण करतील- प्रसाद लाड

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी 542 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. त्यामुळे 2 दिवसांत निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 918 झाली आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. परंतु, भाजपचे कार्यकर्ते यांना अडवत आहे, असा आरोप केला आहे. भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अनिल परब सध्या शंभर कोटी रुपयांखाली बोलत नाहीत, खरमाटेशिवाय अन्य कोणाला भेटायला त्यांना वेळ नाही. मात्र त्यांना शंभर कोटी रुपये मिळाले तर ते एसटी महामंडळाचे राज्य शासनात जरूर विलीनीकरण करतील, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे. ‘परब सध्या खूपच बिझी आहेत, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. खरमाटे वगळता ते कोणालाही भेटत नाहीत. अशाच माध्यमातून परिवहनमंत्र्यांना शंभर कोटी रुपये मिळाले तर ते एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण जरुर करतील. मात्र यांच्या शंभर कोटी रुपयांना आपण नक्कीच गाडून टाकू’, असंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून त्यात प्रवाशांचेही हाल होत आहेत. सर्वच बाजूंनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याने न्यायालयात जाऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे बोलले जात आहे. सध्या कोकण दौऱ्यावर असलेले प्रसाद लाड यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या वसुलीचे प्रकरण गाजते आहे. त्याचा दाखला देत लाड यांनी वरील टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!