मुंबई : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात १७ एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे.
या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले असल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकून भाजपसह काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ केली होती. इतकंच नाही तर कर्नाटकातील मराठी भाषिक असलेल्या गावांचा महाराष्ट्रात समावेश या मागणीसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेनं देखील शेळकेंना पाठींबा दिला होता. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे स्वतः बेळगावात प्रचारासाठी दाखल झाले होते.
दरम्यान, संजय राऊत यांनी सामनाच्या आजच्या रोखठोक मधून सीमावासियांच्या वेदनेवर भाष्य केलं असून या निवडणुकीमध्ये दिसलेलं त्यांच्या ऐक्याचे कायतुक केले आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील या मराठीचे भाषिकांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन केलं आहे. यासोबतच त्यांनी मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्या कानडी सरकारचा आणि तेथील काही संघटनांचा समाचार देखील घेतला आहे.
कर्नाटक सरकारला इशारा…
‘कर्नाटक सरकारचे बरेचसे अर्थकारण हे महाराष्ट्रावर अवलंबून आहे हे कुणीच समजून घेत नाही. कर्नाटकातून रोज किमान 650 बसेस महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रातून रोज फक्त 50 बसेस कर्नाटकात जातात. कर्नाटकच्या परिवहन खात्यालाच महाराष्ट्रातून रोज 30 लाखांचा महसूल मिळतो.’
‘त्यामुळे बेळगावात मराठी लोकांवर हल्ले होताच कोल्हापूर-सांगलीत शिवसेनेचे लोक कर्नाटकच्या बसेसवर हल्ले करून बदला घेतात. हे लोण मुंबईत पोहोचले तर कर्नाटकातील लोकांचे व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल. पण या थराला आता कोणी जाऊ नये. कर्नाटक सरकारने बेळगावातील मराठी लोकांना दुश्मन मानू नये व मराठी भाषेसंदर्भातले त्यांना घटनेने दिलेले अधिकार मान्य करावे.’ असं संजय राऊत मम्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ऑरेंज आर्मीची पराभवाची हॅटट्रिक; मुंबई विरुद्ध १३ धावांनी स्विकारावा लागला पराभव
- लातूर महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपयांची मदत
- हेल्पलाईनच्या माध्यमातून रूग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे : पालकमंत्री
- औरंगाबादमधील ‘ब्रेक द चेन’ नियमावलीत बदल; आता अत्यावश्यक सेवा देखील सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच
- महाराष्ट्रातील मंत्री झोपा काढताहेत का? दरेकर यांचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

