औरंगाबाद : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तर आढवडी बाजार भरविण्यावर बंदी धालण्यात आली आहे. भाजी मंडई सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हे सर्व नवीन आदेश औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागू राहतील. नवीन काढलेले आदेश हे १ मे पर्यंत अंमलामध्ये येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
याबाबत अधिक सविस्तर मुद्दे तसेच बाबी १४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात नमूद असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने दि. १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाच्या आदेशानुसार संचारबंदी लागू केली आहे. ही बाब पुन:श्च सांगण्यात आली आहे. नागरिकांना या आदेशान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे. संबंधित यंत्रणांना सदर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे सुलभ होण्यासाठी केलेल्या सुचना या आदेशामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच संदर्भाधीन आदेशातील नमूद करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि आस्थापना यांना सूट देण्यात आलेल्या वेळेमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
खाली नमूद केल्याप्रमाणे वेळ अंमलात राहिल. सदरचे आदेश संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागू राहतील. जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यावर बंदी असून, भाजी मंडई सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. खालील तक्त्यात नमूद केलेले मुद्दे आणि बाबी हे केवळ संक्षिप्त स्वरुपात नमूद आहेत. याबाबत अधिक सविस्तर १४ एप्रिल रोजी काढेलेल्या आदेशात नमूद असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

