मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गुजरात सरकारचे पत्र दाखवत भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, हीच टीका आता त्यांच्यावरच उलटली आहे. याच प्रकारचे पत्र महाराष्ट्र सरकार का पाठवत नाही, महाराष्ट्रातील मंत्री झोपा काढताहेत का? असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलाय.
या संदर्भात दरेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. यामध्ये ते म्हणाले की, ‘मलिक साहेब, बरे झाले आपण हे पत्र शेअर केले. आम्ही यासाठी भांडून थकलो. देशातील प्रत्येक राज्य स्वतःच्या राज्यातील नागरिकांसाठी जीवाचा आटापिटा करताहेत, इकडे महाराष्ट्रातील मंत्री मात्र झोपा काढताहेत का? असेच पत्र ब्रुक फार्मासाठी द्या, ते तत्काळ रेमडेसिविरचा पुरवठा करयला तयार आहेत.’
मलिक साहेब,बरे झाले आपण हे पत्र शेअर केले.आम्ही यासाठी भांडून थकलो.
देशातील प्रत्येक राज्य स्वतःच्या राज्यातील नागरिकांसाठी जीवाचा आटापिटा करताहेत, इकडे महाराष्ट्रातील मंत्री मात्र झोपा काढताहेत का? असेच पत्र ब्रुक फार्मासाठी द्या,ते तत्काळ #remdesivir चा पुरवठा करायला तयार आहेत, https://t.co/2YDBLlRerl— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 17, 2021
इतकेच नाही तर विरोधी पक्ष नेते देवेंद फडणवीस यांनी केंद्र सरकारला सांगून रेमडेसिविरची निर्यात बंद केली आहे. आता महाराष्ट्रात रेमडेसिविरची विक्री करण्यासाठी कंपनीला राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे आधी कंपनीला पत्र द्या, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. राज्य सरकारमधील मंत्री आणि विरोध पक्ष मात्र, एकमेकांवर आरोप करण्यातच धन्यता मानत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनाची साखळी काही केल्या तुटेना ; आज तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची वाढ
- आ.प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांना अखेर यश, गंगापूर उपजिल्हा रुग्णालयास मिळाली नवीन रुग्णवाहिका!
- परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही – भुजबळ
- एक देश एक रेशन कार्ड सुविधा औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध, नागरिकांनी लाभ घ्यावा
- ‘मलिकने जशी स्वतःची अक्कल दाखवली तसचं महाराष्ट्र FDAचा पण पेपर दाखवावा’


