चेन्नई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग तिसरा पराभव झाला असुन ते गुणतालीकेत सर्वात शेवटच्या म्हणजे आठव्य स्थानी आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित-डिकॉक यांनी सावध सुरुवात करत संघाला अर्धशतकी सलाामी दिली. मात्र रोहित बाद होताच ठरावीक अंतराने गडी बाद झाल्याने धावसंख्येला लगाम बसला. मात्र नंतर फलंदाजीला आलेल्या किरॉन पोलार्डने फटकेबाजी करत संघाला १५० धावांची मजल मारुन दिली. मुंबईकडुन सलामीवीर डिकॉकने सर्वाधीक ४० धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहितने ३२, तर पोलार्डने ३५ धावा केल्या.
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात जोरदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही सलामीवीरानी ५ षटकाच्या आतच अर्धशतकी धावांची सलामी दिली. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या तिसऱ्या षटकात जॉनीने १८ धावा वसुल केल्या. आठव्या षटकांत बेअरस्टो ४३ धावांवर बाद झाल्यानंतरही कर्णधार वॉर्नरचा तडाखा सुरुच होता. मात्र बाराव्या षटकात हार्दिकने वॉर्नरला धावबाद केले आणि सामना मुंबईच्या बाजुने झुकला. इतर फलंदाजापैकी विजय शंकरने फटकेबाजी करत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र मुंबईच्या गोलंदाजानी १९.४ षटकात हैदराबादच्या संपुर्ण संघाला बाद करुन मुंबईला विजय मिळवून दिला. २२ चेंडुत ३५ धावा करणाऱ्या किरॉन पोलार्डला सामनावीराच्या पुस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक, सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
- लातूर महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपयांची मदत
- हेल्पलाईनच्या माध्यमातून रूग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे : पालकमंत्री
- औरंगाबादमधील ‘ब्रेक द चेन’ नियमावलीत बदल; आता अत्यावश्यक सेवा देखील सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच
- महाराष्ट्रातील मंत्री झोपा काढताहेत का? दरेकर यांचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

