लातूर : कोराना रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी यंत्रण तत्पर रहावी, हेल्पलाईनच्या माध्यमातून रूग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे, स्ट्रेस, टेस्ट आणि स्ट्रीट मोहिम प्रभावीपणे राबवावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी युध्दपातळीवरचे प्रयत्न असावेत, खाजगी प्रयोगशाळा मधील कामकाज सुनियंत्रीत करावे, लसीकरणाची मोहिम गतीमान करावी असे आदेश लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठकीदरम्यान सांगितले.
आढावा बैठकीमध्ये विविध विषयांची माहिती देखील घेतली. तसेच नागरीकांच्या लसीकारणाला प्राधान्य देण्यात यावे, अमित विलासराव देशमुख यांनी दुसऱ्या प्राधान्य क्रमात प्राध्यापक, शिक्षण, पत्रकार यांचे लसीकरण करावे, महापालीका कोवीड केअर सेंटर मधील ऑक्सिजेनेटेड आणि वेन्टिंलेटर बेडची संख्या वाढवावी. महापालीकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपये पर्यंत खर्च करण्यात येत आहे हे जाहीर करावे. गॅसदाहीन्या कार्यान्वित कराव्यात अशी सुचना देखील पालकमंत्री देशमुख यांनी दिली आहे.
भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावी. दोन प्रभागासाठी १ या प्रमाणात ३० बेडची रूग्णालये उभारावीत. या ३० पैकी ५ बेड वेन्टिलेटर १५, बेड ऑक्सिजनेटेड तर १० बेड सर्वसाधारण असावेत आदी प्रकारच्या सुचना करून महापालीकेच्या या मोहिमेत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. सुरुवातीला अमित देशमुख यांनी लातूर मनपाकडून कोविड १९ बाबत सुरू केलेल्या मदत कक्षासह महापौर व विरोधी पक्ष नेत्याच्या दालनाची पाहणी देखील केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

