Share

…म्हणून मी शिवसेना सोडली; भुजबळांनी सांगितलं कारण

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली यांचं कारण स्पष्ट सांगितलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचे कारण सांगितले आहे. ‘आरक्षणाच्या बाबतीत शिवसेना कधीही बोलली नाही. आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका घेऊन मी मोर्चात सहभागी झालो होतो. तेव्हा माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरू झाली राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता. बाळासाहेब ठाकरे पत्रकार परिषद घेणार होते. त्याचवेळी मंडल आयोग लागू झाला पाहिजे, म्हणून अनेक आमदार माझ्यासोबत होते. अन् हेच कारण झालं मी शिवसेना सोडली’, असे भुजबळ यांनी सांगितले.

मी आमदार असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी वसंतदादा पाटलांच्या अंगावर आम्ही धावून जायचो, तत्कालीन सरकारने आम्ही मंडल आयोग स्वीकारतोय, असं सांगितलं होते. व्ही. पी. सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं. अन् माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरु झाली.

बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब नाशिकच्या घरी आले होते. त्याचवेळी भटक्या विमुक्तांचा मोर्चा निघाला होता. बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. आरक्षण मिळालं पाहिजे, असं मी नेहमी म्हणायचो. लोकसंग्रह वाढवणं हे त्याकाळी गरजेचे होते. त्यामुळे शिवसेना आणि माझ्यात दुरावा झाला अन् मी शिवसेना सोडली. त्यानंतर मी समता परिषदेची स्थापना केली, असं भुजबळ म्हणाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!