Share

भाजपने त्वरित आमदार सुनील कांबळे यांना निलंबित करावे; राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

Published On: 

पुणे : भाजपचे पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

दरम्यान आता याच घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्वीट करत आमदार सुनील कांबळे यांना भाजपने निलंबित करावे अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेतील एका वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांस अतिशय किळसवाण्या भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या एखाद्या आमदाराने किंवा नेत्याने महिलांचा अवमान करण्याची, त्यांना कमी लेखण्याची ही काही पहिली वेळ नाही.

यावेळी सुनील कांबळे यांच्याकडून हा संतापजनक प्रकार घडला असला तरी हा प्रश्न व्यक्तीचा नसून प्रवृत्तीचा आहे. महिलांना दुय्यम समजणे ही भाजपच्या सर्वच नेत्यांची प्रवृत्ती असून आमदार सुनील कांबळे हे त्या प्रवृत्तीचं केवळ एक उदाहरण आहे. केवळ महिलांनाच नव्हे तर कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीला लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली आहे, या संतापजनक प्रकाराचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या या पुणे शहरातील नागरिक भारतीय जनतेच्या या असंस्कृत आणि घाणेरड्या प्रवृत्तीला येत्या काळात नक्कीच योग्य तो धडा शिकवतील. भारतीय जनता पक्षाने त्वरित या आमदारास निलंबित करावे.’ अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!