उस्मानाबाद : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने महाविकास आघाडीवर भाष्य केले आहे. जोवर उद्धव ठाकरे यांना वाटेल तोवरच महाविकास आघाडी सरकार टीकेल. सरकार चालवायचं तोपर्यंत चालवतील त्यानंतर पुढचा निर्णय घेतील असं माजी वनमंत्री संजय राठोड यांनी म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकार टीकवायचं की नाही हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सध्यातरी सरकार स्थिर आहे परंतु ते टिकवायचे की नाही? किती काळ टिकवायचं? हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सरकारच्या स्थापनेपासून सरकार आता कोसळेल, इतक्या दिवसांत कोसळेल असं सांगितलं जात आहे. परंतु भाजप नेत्याचा दावा चुकीचा आहे. सरकार टिकवण्याचा निर्णय फक्त ठाकरेंच्या हातात आहे, असं राठोड यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचं कौतुक देशभरात झालं आहे. लोकांना शिवसेनेच्या सरकारचं काम आवडलं आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येणार वैगेरे यात काही तथ्य नाही, असंही संजय राठोड म्हणाले आहेत.
आरोप करून त्यामागचं तथ्य पुढे येण्याअगोदरच एखाद्याला शिक्षा देणं हा चुकीचा पायंडा आपल्याला बदलला पाहिजे. कुठल्याही पक्षात कार्यकर्ता बनायला अनेक वर्ष जातात. मी ३० वर्षाच्या राजकारणात ४ वेळा निवडून आलो आहे. माझ्यावर आरोप झाले. त्याची चौकशी होईल सत्य सगळ्यांसमोर येईल. काही तथ्य आढळलं तर शिक्षाही होईल. पण हा पायंडा बदला, असं संजय राठोडांनी आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी


