Share

…त्यामुळे मला आत्ताचं राजकारण सभ्य म्हणायला नकोसं वाटतं’- पंकजा मुंडे

Published On: 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेल्या पोलखोलमुळे करुणा शर्मा सध्या चर्चेत असून बीडचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, करूणा शर्मा प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. याच पार्श्वभूमीवर आता पंकजा यांनी त्यांनी केलेल्या ट्विट संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

पंकजा यांनीं अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्याचे बोलले जात होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की,’अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची’

दरम्यान, याविषयी पत्रकारांशी बोलतांना पंकजा म्हणाल्या की,’जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो, आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताचं राजकारण सभ्य म्हणायला नकोसं वाटतं’. तसेच ‘राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाही. त्यात आपण राजकीय संस्कृतीचे ट्रेंड जे निर्माण होत आहेत ते भविष्यासाठी फारसे चांगले नाहीत’ असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!