Share

राज्यातील महिला अत्याचार प्रकरणी पंकजा मुंडे आक्रमक; म्हणाल्या…

Published On: 

बीड : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईमधील साकीनाका येथे झालेल्या घटनेनंतर डोंबिवली, सातारा, कल्याण आदी ठिकाणहून देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलत असतांना पंकजा म्हणाल्या की,’आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान देण्यात आले आहे. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाष्य करत आहे. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचे जे चित्र आहे ते थोडेसे विदारक दिसत आहे’ असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, या विषयी अधिक बोलत त्या म्हणाल्या की,’या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो पण खरे काम पोलिसांचे आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत जेणेकरुन आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याचा आणि त्रास देण्याचा, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे’ असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!