🕒 1 min read
नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केली आहे. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
यावरून राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून ईडीच्या कारवाईच्या भाजप नेत्यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी भाष्य करत आपल्यावर राजकीय हेतूनेच आरोप केले जात असल्याच भाष्य केलं आहे. ‘मागच्या काळात सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ईडीच्या माध्यमातून होणार. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होत आहे,’ असं देशमुख म्हणाले.
यासोबतच, ‘मी गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणात कारवाई केली. त्याचबरोबर सीबीआयला जी महाराष्ट्रात कोणताही तपास करण्याची मुभा होती त्यावर आम्ही निर्णय घेऊन शासनाच्या परवानगी शिवाय चौकशी करू शकत नाही, असा निर्णय घेतला. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मी विधानसभेत मत मांडलं. त्यामुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणून माझी चौकशी होत असावी. मात्र सत्य पुढे येईल,’ असं भाष्य अनिल देशमुख यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला समजलंय त्यांची लढाई राज्य सरकारविरोधात नाही – उद्धव ठाकरे
- म्युकोरमायकोसीसचा धोका वाढतोय, मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात- माजी उपमहापौर
- अभिनेत्री श्रृती हसनला घराचे हफ्ते भरण्याची सतावते चिंता
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

