Share

…म्हणून गडकरींनी चक्क रात्री बँकेचं लॉकर उघडून केली ‘त्यांना’ ३५ लाखांची मदत !

Published On: 

नागपूर : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अजातशत्रू नेता म्हणून ओळखलं जातं. राज्यात युतीचं सरकार असताना राज्याचं मंत्रिपद सांभाळताना महामार्गाची महत्वाची कामे असो वा आता केंद्रीय मंत्री असताना देशाच्या कठीण भागात रस्त्याची कामे ! गडकरींच्या व्हिजनचे अप्रूप सर्वांनाच आहे. त्यांच्या रस्ते निर्माणाच्या कामामुळे त्यांची ओळख आता ‘रोडकरी’ अशी झालीये.

दरम्यान, आता गडकरींच्या एका भाषणाचा व्हिडीओ सध्या शोधलं मीडियामध्ये तुफान व्हायरल होतोय. यात त्यांनी आपल्या खासगी स्वीय्य सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले याचा खुलासा केला आहे. स्वीय्य सहाय्यकाला एअर ऍम्ब्युलन्सने चेन्नईला नेण्यासाठी ३५ लाख रुपये गडकरींनी उपलब्ध करून दिले. हे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं याचं गुपित त्यांनी या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

नक्की का हवे होते ३५ लाख ? आणि ते कसे मिळवले ?

‘कोरोनाच्या काळात एक घटना घडली जेव्हा माझे खासगी स्वीय्य सहाय्यक मंडलेकर जे नागपूरचं काम पाहतात त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना विवेका रुग्णालयात भरती करण्यात आलं. ते नागपुरातील सर्वात चांगलं रुग्णालय आहे. मी डॉक्टरांना भेटलो असता त्यांनी आता आम्ही हरलो, काही करु शकत नाही असं सांगत हात टेकले. मी त्यांना उपाय विचारला असता त्यांनी चेन्नईमधील एमजीएम रुग्णालय जिथे ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण होतं तिथे नेल तर काही तरी होऊ शकतं सांगितलं.’

‘आमच्याकडे २४ तासांचा वेळ होता. मी घरी आल्यानंतरही चिंतेत होतो. कारण त्यांचे वडील माझ्या मोठ्या भावासारखे होते. माझ्या परिवारातील एक व्यक्ती अशा स्थितीत असल्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता होती, रात्री झोप लागली नाही. मी घरी आल्यावर ऑफिसच्या स्वीय्य सहाय्यकांना गोळा केलं आणि लगेच एअर ऍम्ब्युलन्सची सोय करण्यास सांगितलं. एमजीएम रुग्णालयासोबत चर्चा केली.

‘अमेरिकेतील डॉक्टर, मित्र शोधले. मला लगेच एमजीएम रुग्णालयाच्या एमडीचा, तसंच तेथील दीपा नावाच्या डॉक्टरांचा फोन आला. ऍम्ब्युलन्सवाला ३५ लाख रुपये ऍडव्हान्स पाहिजे असं सांगत होता. संध्याकाळी सहा वाजल्याने सगळ्या बँका बंद झाल्या होत्या. माझी बायको एका को – ऑपेरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे. मी लगेच बँकेच्या सीईओना फोन करुन बोलावलं आणि रात्री लॉकर उघडता येईल का? असं विचारलं. मला लॉकरमधून ३५ लाख दे, मी तुला उद्याच्या उद्या पैसे परत करेन असं म्हटलं. ते पैसे आणले, कसं पाठवायचं ठरलं. त्या ऍम्ब्युलन्सवाल्याला पैसे दिले. मशीन घेऊन ते आले आणि पाच डॉक्टरही सोबत होते. एअरलिफ्ट करुन चेन्नईला नेलं. तिथे उपचार झाले आणि तो बरा झाला.’ असं सांगतानाच गडकरी भावुक झाल्याचं दिसून आलं.

ही मदत करता आल्याने त्यांना मनस्वी आनंद झाल्याचे देखील सांगितलं. ‘आयुष्यामध्ये केवळ सत्ता, संपत्ती हेच आयुष्याचं टार्गेट नसतं. सत्ता, संपत्ती ही केवळ माध्यमं आहेत, उद्दिष्ट असू शकत नाहीत. कारण मंत्रिपद किंवा किती सर्वोच्च सत्ता मिळाली तरी त्यातून काही समाधान मिळतं असं नाही. संपत्ती कितीही मिळाली तरी समाधान मिळत नाही.’ असं देखील त्यांनी आवर्जून सांगतानाच सध्याच्या नेत्यांसमोर आदर्श निर्माण करून दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!