Share

‘हातात पेपर न घेता ठाकरे किंवा पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र जनतेला समजून सांगावं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा आवश्यक पुरवठा उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर विविध भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘हे पत्र हातात पेपर न घेता मुख्यमंत्री ठाकरे वा उपमुख्यमंत्री अजित पवार वयानी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला समजून सांगावं, असं आव्हानच भाजप नेते निलेश राणे यांनी दिलं आहे.

‘हातात पेपर न घेता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दोंघान पैकी एकानी तरी हे PM साहेबांना पाठवलेलं पत्र महाराष्ट्राच्या जनतेला फेसबुक लाईव्हवर समजून सांगावं. सरळ सरळ दिसतंय हे पत्र अधिकाऱ्यांनी बनवलं आहे, ज्या दिवशी उद्धव ठाकरे असं पत्र स्वतः बनवतील त्या दिवशी संज्या लीलावतीत,’ असा प्रहार निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!