Share

कोरोनाचा उद्रेक : ‘या’ जिल्ह्यात किराणा दुकानांसह भाजीपाला देखील राहणार बंद !

Published On: 

परभणी : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

यामध्ये आज (१५ एप्रिल) रोजी अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांनी किराणा दुकानाबाहेर आणि भाजी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे आता राज्यातील कठोर नियमांचा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला असतानाच परभणीमध्ये किराणा, भाजी आणि बेकरीचे दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणीमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार १७ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत किराणा, भाजी आणि बेकरीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. बुधवारी जिल्ह्यात तब्बल ११७२ रुग्णांची वाढ झाली, तर २० जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे कठोर पाऊल उचललं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!