Share

बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Published On: 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. ही लढत तिरंगी झाल्याचं आता दिसून येत आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, काँग्रेस कडून आमदार सतीश जारकीहोळी, तर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके उभे राहिले आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना शिवसेनेनं आपला पाठींबा दिला आहे. इतकंच नाही तर १४ एप्रिल रोजी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यानंतर, आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील बेळगावात सभा पार पडली असून त्यांनी संजय राऊतांसह शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

‘आता महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरता शिवसेना नेते इथे आले. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. मात्र आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगाण स्पर्धा घेतली’ अशा शब्दांत त्यांनी प्रहार केला आहे.

यासोबतच, ‘महाराष्ट्र एकीकरण समिती कधीच लोकसभा निवडणूक लढवत नाही. या उमेदवाराच्या प्रचारासाठी समितीतील एकही जुना माणूस पुढे आलेला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण इथला मराठी माणूस भाजपला मत देतो. ही मते कमी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला उभे करण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यांचा हा उमेदवार देखील स्पॉन्सरड दिसत आहे,’ असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!