Share

..तर मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का?, मलिकांचा फडणवीसांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत. नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावाही त्यांनी केलाय.

यावर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी गैरप्रकारे किंवा दबाव टाकून कुठलीही संपत्ती घेतली नाही किंवा अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही तरीही माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचं असेल तर दाऊद कासकरचं कोकणातील घर हे सनातन संस्थेने घेतले मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का? असा सवाल मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

‘फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. पण त्यांचे फटाके भिजल्यामुळे त्याचा आवाज नाही आला’. अंडरवर्ल्डशी संबंधाच्या आरोपांवर मलिक म्हणाले, ‘देवेंद्रजी आपण १९९९ मध्ये मुंबई शहरात पहिल्यांदा आमदार बनून आले. ६२ वर्षाच्या आयुष्यात या शहरात तुमच्याआधी दिवंगत दिवंगत मुंडे साहेब होते जे दाऊद सोबत लोकांना जोडत होते. आम्ही मंत्री होतो तेव्हा सुद्धा मुंडे साहेबांचे भाषण विधानसभेत होत असत. परंतू एवढ्या वर्षात आमच्यावर कोणी आरोप लावू नाही शकले. आज एका जागेसंदर्भात काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवले. कवडीमोल जमीन आम्ही माफियांकडून खरेदी केली, असा आरोप तुम्ही केला. पण तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत असे मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!