🕒 1 min read
नवी-दिल्ली : आपल्या मंत्रीमंडळामधील एकाही व्यक्तीला हिंदी भाषा कळत नाही त्यामुळे मुख्य सचिव हा मिझो भाषेचं ज्ञान असणारा असावा, अशी मागणी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. फक्त एवढेच नाही तर राज्याच्या मुख्य सचिवांना मिझो भाषेमधील कारभार समजत नसल्याने त्यांच्याऐवजी स्थानिक भाषा समजणाऱ्याला या पदावर नियुक्त करावे, असे देखील ते म्हणाले आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हे पत्र २९ ऑक्टो. रोजी पाठविण्यात आले असून ‘माझ्या कार्यालयामध्ये काम करणारे माजी मुख्य सचिव लालनूमाविया चुआंगो हे गुजरात कॅडरचे अधिकारी निवृत्त झाल्यानंतर मी माझे सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. सी. रामथंगा (मणीपूर कॅडर) यांना मुख्य सचिव करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्रालयाने रेणू शर्मा यांना मुख्य सचिव म्हणून नियुक्त केलं’,असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पत्रात केला आहे.
दरम्यान, २८ ऑक्टो. रोजी रेणू यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पत्र पाठवण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून रेणू यांनी कार्यभार स्वीकारला आहे.ज्या दिवशी रेणू यांची नियुक्ती झाली त्याच दिवशी मिझोरम सरकारने रामथंगा यांना मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता राज्यात केंद्राकडून नियुक्त करण्यात आलेल्या रेणू शर्मा आणि राज्याने नियुक्त केलेले रामथंगा असे दोन मुख्य सचिव आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू


