🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत.
यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, १९९३ बॅाम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
१९९३ बॅाम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत…
सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
यावेळी फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या किमान ५ व्यवहारांची माहिती आपल्याकडे असून त्याची कागदपत्र संबंधित तपास यंत्रणांना आपण देणार असल्याचेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

