मुंबई : संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.
यावरच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, नियम तोडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील सोडत नाही, संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीबाबत भाष्य केलं.
पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचं पालन केलं जाईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते. कोरोना संदर्भातली बैठक सुरू असताना शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले असतानाच चर्चांना उधान आले होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी संजय राठोड यांच्या पोहरादेवी मधील शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- पुणे : तडीपार असतानाही सराईत गुंड हातात कोयता घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
- आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक
- पंतच्या मस्तीने विराटही घाबरला, पहा व्हिडीओ
- मोबाईलवरुन झालेल्या वाादात चाकू भोसकल्याने तरुणाचा मृत्यू
- उत्पादन शुल्क निरीक्षकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल


