लातूर : शहरातील राजीवनगर येथे गणेश कदम आणि संयम गटागट यांच्यात मोबईलवरुन शुल्लक वाद झाला. पण या दरम्यान वाद टोकाला गेला. संयम गटागट याने गणेश कदम याला चाकू भोसकला आणि यात गणेश कदम गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
राजीवनगर रोड येथील रहिवासी असलेल्या गणेश कदम हा सोमवारी रात्री हत्ते चौकात आला होता. यावेळी तिथे असलेल्या संयम गटागट यांच्या सोबत गणेश याचा मोबाईलच्या शुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यांच्यात बाचाबाची वाढत गेली आणि शिवीगाळही सुरु झाली. शिविगाळ केल्यानंतर हा वाद टोकाला गेला आणि संयम गटागट याने रागाच्या भरात गणेश याच्या पाठीत चाकून भोसकले. त्यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला.
उपस्थितांनी तत्काळ गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गणेशला तपासुन मृत घोषीत केले. याबाबत पोलिस ठाण्यात गणेशचा भाऊ दत्ता रमेश कदम यांनी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी संयम टकाटक याला पोलिसांनी तातडीने आटक केली आहे. अधिक तपास लातूर उपविभागीय पोलिस आधिकारी जितेंद्र जगदाळे करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली अन् ब्रिटनमधील महिलेने घातला ३५ हजारांचा गंडा
- ‘राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो’
- “एखाद्या राजासारखे होऊ नका, जमीनीशी नातं असणारा नेता व्हा”, मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र
- जालना महापालिकेचा प्रस्ताव सभेत आल्यास फेटाळून लावणार : अशोक पांगारकर
- ‘दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
