Share

उत्पादन शुल्क निरीक्षकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

Published On: 

नांदेड : लाच मागणाऱ्या बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बीअरबार कायमस्वरुपी वर्ग करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागीतली असा आरोप निरिक्षक सुभाष खंडेराय यांच्यावर आरोप होता. नतंर तडजोड करुन सुभाष यांनी १ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत निरीक्षकावर गुन्ह दाखल केला आहे.

बिलोली येथील एका बिअरबारचे दुकान हे तक्रारदाराच्या नावे कायमस्वरुपी वर्ग करुन द्यावे अशी तक्रारदाराची मागणी होती. यासाठी ते बिलोली येथील निरीक्षक सुभाष खंडेराय यांच्याकडून आहवाल प्राप्त होणे गरजेचे होते. तो आहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र सुभाष खंडेराय यांनी सकारात्मक आहवाल पाठवण्यसाठी २ लाख रुपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती.

तक्रारीनुसार नरसी नायगाव रस्त्यावर एका बारसमोर पंचासमक्ष निरीक्षक सुभाष यांनी लाचेची मागणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात खंडेराय यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश पुरी हे करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!