Share

पंतच्या मस्तीने विराटही घाबरला, पहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : चेन्नईमध्ये इंग्रजांना पाणी पाजल्यानंतर विराट सेना आता अहमदाबाद मधील नव्या कोऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये इंग्रजांना धूळ चरण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (२४ फेब्रुवारी)  अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

सामन्याआधीच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत ड्रोन कॅमेरासह मस्ती करताना दिसला आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज असून त्यांनी सामन्याआधी बरीच मेहनत घेतली आहे. दरम्यान, या सामन्याआधी सराव सुरु असताना रिषभने ड्रोन कॅमेराचे कंट्रोलर हाताळले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे.

बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘काही चांगले झेल घेतल्यानंतर, यष्टीचीत केल्यानंतर आणि काही मोठे षटकार मारल्यानंतर रिषभ पंत आता ड्रोन कॅमेरासोबत मस्ती करत आहे.’

https://twitter.com/BCCI/status/1364115849368363013?s=20

बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की ड्रोन कॅमेराचा रिमोट रिषभच्या हातात आहे. तसेच तो ड्रोन कॅमेरा उडवत भारतीय खेळाडूंच्या सरावादरम्यानची दृश्ये टिपत आहे. यावेळी अजिंक्य रहाणे ड्रोन कॅमेराकडे पाहून हसत आहे. तसेच प्रशिक्षक रवि शास्त्री मार्गदर्शन करत आहेत. चेतेश्वर पुजारा ड्रोन कॅमेराला बॅटने मारण्याचा प्रयत्न करत आहे, तर आर अश्विन ड्रोन कॅमेराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, सराव करत असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीला या गोष्टींची कल्पना नसल्याचे समजते, त्यामुळे अचानक त्याच्याजवळ ड्रोन कॅमेरा आलेला पाहून तो घाबरल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!