पुणे – कुख्यात गुंड गजा मारणेच्या कारनाम्यांमुळे पुणे शहर सध्या चर्चेत आहे.खुनाच्या दोन गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजानन मारणे याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गजाने मोठे शक्तीप्रदर्शन केले यानंतर पोलीस प्रशासनाच्या कारभारवर देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान गजा मारणे याने अशाप्रकारे मिरवणूक काढल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात तळेगाव दाभाडे, हिंजवडी, कोथरूड, वारजे आणि खालापूर या पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले.एका बाजूला हे सर्व घडत असताना आता तडीपार असतानाही सराईत गुंड हातात कोयता घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,रोशन लोखंडे असे या तडीपार करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. नऱ्हेतील ही घटना असून संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोशन लोखंडे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
हातात कोयता घेऊन तरुणाच्या खांद्यावर बसून तो नाचताना दिसत आहे. तर याच ग्रुपमध्ये नाचणाऱ्या अन्य एका तरुणाच्या हातात बंदूकही दिसत आहे. या व्हिडिओमुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोशन लोखंडे हा सराईत गुन्हेगार असून पुणे पोलिसांनी त्याला यापूर्वीच शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी शस्त्र जवळ बाळगणे दरोडा आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराला उडवले; औरंगाबादेत रात्री भीषण अपघात
- मराठवाड्यात ६०५, औरंगाबादेत सर्वाधिक २४० रुग्णांची भर; १९७ कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू
- कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- मंत्रालयाच्या कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कराव्यात, मुख्यामंत्र्यांची सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
