जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना अवैध धंद्यांना ऊत आला आहे. बदनापूर तालुक्यातील कडेगाव शिवारातील छावा ढाब्यावर अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून शनिवारी पोलिसांनी वीस जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी जुगार साहित्यासह रोख रक्कम व मोबाइल असा एकूण एक लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जालना-औरंगाबाद मार्गावरील कडेगाव शिवारातील गेवराई फाट्याजवळ छावा ढाब्यावर अवैधरीत्या जुगार खेळवला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी आज दुपारी पथकासह या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी २० ते २२ जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी संशयित शेख शब्बीर शेख मन्नू, लखन विठ्ठल मानकर, फारुक शेख रोशन, रामेश्वर विठ्ठल खैरे , कुंदन नारायण गोमतीवाले , ज्ञानेश्वर दौलतराव काळे, बळीराम प्रभाकर नेमाने, मन्मथ रामभाऊ चोंडे, आसाराम प्रभू माने, गणेश अंबादास लोखंडे, प्रल्हाद नारायण महाडिक , सय्यद हसन, मनोज प्रभाकर कारेगावकर, शिवकुमार सर्जेराव शिरसाठ, उदय कपिल यादव, मधुकर मोहनराव निकाळजे, किसन आबाराव सवडे, दिनेश चतुरसिंग दिलवाले, प्रदीप प्रल्हाद पाटील, हॉटेल मालक विठ्ठल माने यांना जुगार खेळताना ताब्यात घेतले.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुंबईत कर्नाटकातील लोकांना व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल; राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा
- ऑरेंज आर्मीची पराभवाची हॅटट्रिक; मुंबई विरुद्ध १३ धावांनी स्विकारावा लागला पराभव
- औरंगाबादेत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक, सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
- हिटमॅन शर्मा धोनीला मागे टाकत बनला ‘सिक्सर किंग’
- हेल्पलाईनच्या माध्यमातून रूग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे : पालकमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

