Share

‘या’ विजयामुळे मुंबई अव्वल स्थानी ; कोहली आणि धोनीच्या टीमला फटका

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे. तर विराट कोहलीची आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला होता. या पराभवानंतर त्यांनी पुनरागमन केलं आणि पुढच्या दोन्ही मॅच जिंकल्या.

नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित-डिकॉक यांनी सावध सुरुवात करत संघाला अर्धशतकी सलाामी दिली. मात्र रोहित बाद होताच ठरावीक अंतराने गडी बाद झाल्याने धावसंख्येला लगाम बसला. मात्र नंतर फलंदाजीला आलेल्या किरॉन पोलार्डने फटकेबाजी करत संघाला १५० धावांची मजल मारुन दिली. मुंबईकडुन सलामीवीर डिकॉकने सर्वाधीक ४० धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहितने ३२, तर पोलार्डने ३५ धावा केल्या.

धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात जोरदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही सलामीवीरानी ५ षटकाच्या आतच अर्धशतकी धावांची सलामी दिली. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या तिसऱ्या षटकात जॉनीने १८ धावा वसुल केल्या. आठव्या षटकांत बेअरस्टो ४३ धावांवर बाद झाल्यानंतरही कर्णधार वॉर्नरचा तडाखा सुरुच होता. मात्र बाराव्या षटकात हार्दिकने वॉर्नरला धावबाद केले आणि सामना मुंबईच्या बाजुने झुकला.

IPL पॉईंट टेबल

आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने झाले आहेत. सध्या मुंबई इंडियन्स या टेबलमध्ये टॉपवर आहे. तर विराट कोहलीची आरसीबी दुसऱ्या आणि महेंद्रसिंह धोनीची सीएके तिसऱ्या नंबरवर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!