Share

एका व्यासायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव ! त्यांचा दोष काय? काँग्रेसचा फडणवीस-दरेकरांना सवाल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.

आता हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री त्यांना अटक झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.

या सर्व घटनेनंतर काँग्रेसने भाजपला नेत्यांना लक्ष करत पोलिसांचा दोष काय ? असा सवाल केला आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून टीकास्त्र सोडलं आहे. ‘एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘पोलिसांकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या ६०००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस जी रात्रीसुध्दा धावले,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

यासोबतच, ‘कोरोना महामारी मध्ये रेमडेसीवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत? भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का?आपलं कर्तव्य तत्परतेने बजावणाऱ्या डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे जाहीर अभिनंदन व भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध!,’ असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!