मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
यावरून राज्य सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला असून महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट केलं आहे. त्यामुळे राजकारण देखील तापलं आहे. तर, आवश्यक औषधे वा बेड्स मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून फोनद्वारे देखील त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
आता राज्यातील गंभीर स्थितीमुळे ठाकरेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी महत्वाची चर्चा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन दिलं असून ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे महाराष्ट्रासाठी हे दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुंबईत कर्नाटकातील लोकांना व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल; राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा
- विराटच्या विजयाचा रथ रोखण्याचे मॉर्गनपुढे आव्हान; सुपर संडे मध्ये आज आरसीबी-केकेआर भिडणार
- औरंगाबादेत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक, सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
- हिटमॅन शर्मा धोनीला मागे टाकत बनला ‘सिक्सर किंग’
- रेमडेसिविर: मंत्र्याच्या सांगण्यावरून पुरवठादार कंपनीला धमकी; फडणवीसांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

