मुंबई : राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोना वाढीचे प्रमाण आटोक्यात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने कडक निर्बंध लावण्यात येत आहेत.
अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेने कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन केलं आहे. अन्यथा लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागेल अशी तंबीही देखील त्यांनी दिली होती.
दरम्यान, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सहकार्याचे आवाहन करतानाच अखेरचा इशारा देखील दिला आहे.
‘गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,’ असं उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !
- सचिन वाझेंचे पाय खोलात; अंतरिम जामीन न्यायालयाने नाकारला
- ‘…लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल’
- मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाला ५ वर्षे सक्तमजुरी
- रश्मी ठाकरेंसह वायकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता सोमय्यांना मानहानीची नोटीस


