औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जटील होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. त्याच्याच भाग म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील करण्यात आली. त्यातून काही निष्पन्न न झाल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पैठण गेट येथे आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चा आरक्षणासाठी विविध आंदोलन करीत आहे. न्यायालयाने आरक्षण बरखास्त केल्यानंतर शिष्ठमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात अनेक बाबींसाठी मुख्यमंत्र्यांनी होकार दिला होता. परंतु त्या बाबी पूर्ण न केल्यामुळे पैठण गेट येथे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आल. आणि जीआरच्या प्रती फाडत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
दरम्यान, सारथी वगळता मराठा समाजासाठी देण्यात आलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या नाही. तसेच स्थापित करण्यात आलेली उपसमिती बरखास्त न केल्यामुळे आगामी काळात ठोक मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री हटाव, अशोक चव्हाण हटावचा नारा देत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली, सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार’; भाजपचा टोला
- धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
