Share

अमित देशमुखांच्या सूचनेनुसार शहराच्या स्वच्छतेसाठी सहा जेसीबी सज्ज; आता स्वच्छतेची प्रतीक्षा!

Published On: 

लातूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांच्या संख्येत घट बघायला मिळत आहे तसेच आता मॉन्सून जवळ येत असल्याने शहरातील साफ सफाई देखील करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असते तसेच कोविडच नव्हे तर इतर अनेक अंजरांची लागण या दिवसांमध्ये होण्याची शक्यता असत. तसंही आजकाल रोगांमध्ये देखील चांगलीच चढाओढ दिसत आहे, एकीकडे कोविड तर दुसरीकडे म्युकरमायकोसीस. मात्र आता लातूर शहराच्या स्वच्छतेसाठी सहा जेसीबी सज्ज करण्यात आल्या आहेत. आता स्वच्छतेची प्रतीक्षा लातूरकरांना आहे.

लातूर शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता कामासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार ६ जेसीबींची खरेदी केल्या आहेत. जेसीबी सेवेत दाखल झाल्या असून, त्यामुळे स्वच्छतेच्या कामाला अधिक गती येणार आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समिती सभापती ॲड. दीपक मठपती, आयुक्त अमन मित्तल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी या यंत्रांचे पूजन करण्यात आले.

लातूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधा पुरविण्याची पालिकेची जबाबदारीही वाढलेली आहे. पालिकेकडे यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे. परंतू बदलत्या काळानुसार त्यात यांत्रिकी साहित्याची निकड भासत आहे. कामाची व्याप्ती पाहता यंत्रांचा वापर गरजेचा झालेला आहे. त्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार जेसीबी वाहने खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी ही वाहने लातूरकरांच्या सेवेत दाखल झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!