Share

‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव

Published On: 

नाशिक : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झाली आहे. तो आज कारागृहातून बाहेर आला. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमधये बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जेलवारीचा अनुभव सांगितला.

यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’नाशिकच्या कारागृहात अनेक स्वातंत्र्य योद्धे राहिले आहेत. साने गुरुजीही याठिकाणी होते. कारागृहात येणारे कैद्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही समाजाला नकोसे असतात. तर काही लोकांना जामीन झाला तरी ते परत आत येतात. आतमध्ये सगळ्या सोयी असल्यानं काहीचं आत येणं जाणं सुरु असतं. त्याचबरोबर माझाही आर्थर रोड कारागृहाचा दोन अडीच वर्षाचा अनुभव आहे. गृहमंत्री असताना कारागृहातील पोलिसांचा पगार मी वाढवला. एक दिवस त्याच जेलमध्ये मला जावं लागलं. जे माझ्या स्वागतासाठी होते, नंतर तेच माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कारागृहात सिनेमाचे कलाकार असतात तसे इतरही कलाकार असतात. संजय दत्त यांनीही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं. कैदी कसे जनावरांसारखे राहतात हे मी पाहिले आहे. प्रचंड गर्दी असते. पण तरी देखील कोरोना आत घुसला नाही हे महत्वाचं आहे. अनेक लोक 15 हजारांचा जामीन भरू शकत नाहीत म्हणून वर्षानुवर्षे आत आहेत. अशा लोकांसाठी काम करणाऱ्या आता अनेक संस्था आहेत,’ आपणही त्याच असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!