Share

‘लोकांना तुरूंगात ठेवून पब्लिसिटी करून घेणं हा वानखेडेचा उद्योग’- नवाब मलिक

Published On: 

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहे. यावरुन सध्या एकच खळबळ उडाली आहे.  यातच आता नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आर्यन खान जामीन प्रकरणी नवाब मलिक म्हणाले की, “कुख्यात गुन्हेगार असतील, दहशतवादी असतील तर त्यांना तुरुंगात ठेवलंच पाहिजे. पण जामीन लोकांचा अधिकार असतो, ही पळून जाणारी लोक नाहीत. कधीही कुठल्याही तपासामध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा ते हजर होवू शकतात. अशा लोकांना तुरूंगात ठेवून केवळ पब्लिसिटी करून घेणं हा उद्योग समीर दाऊद वानखेडेचा सुरू होता. यापुढे बऱ्याच केसेस आहेत, ज्या समीर वानखेडेने तयार केलेल्या आहेत. त्या कशा बोगस आहेत, याचे पुरावे आम्ही सगळे शोधून काढलेले आहेत.” असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, मलिकांनी ‘क्रुझवर रेव्ह पार्टी होणार होती असा दावा एनसीबीने केला होता. त्या रेव्ह पार्टीमध्ये फॅशन टिव्ही आयोजक होती आणि त्याचा हेड काशिफ खान होता त्यामुळे काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? आजपर्यंत त्या दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही?, याची उत्तरं समीर वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहेत’, असे म्हणत मलिक यांनी समीर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच काशिफने देखील यावर प्रतिक्रिया देत नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!