Share

वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार

Published On: 

पुणे: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. वळसे पाटील यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्यानं मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. तर आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना अनेक राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे गृहमंत्री, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीप वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कोरोनावर मात करून आपण लवकरात लवकर सेवेत पुन्हा रुजू व्हाल, याची खात्री आहे. आपणांस उत्तम स्वास्थ्यासह दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! असे ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू खुले होत असतानाच, राज्य सरकारची चिंता वाढवणारी ही बातमी आता समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!