मुंबई :मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २ ऑक्टोबर रोजी आर्यन खानसह इतर काही जणांना अटक केली होती. त्यामुळे मागील तीन आठवड्यापासून आर्यन तुरुंगात होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर व्हावा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर २८ ऑक्टोबरला त्याचा मुंबई हायकोर्टाकडून आर्यन खानला दिलासा मिळाला. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला.
आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. परंतु याप्रकरणात अभिनेत्री जुही चावलाच्या नावाची चर्चा अधिक रंगली आहे.
आर्यन खानच्या जामिनानंतर काही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जुही चावला मुंबई सत्र न्यायालयात पोहचली होती. आर्यनच्या जामिनासाठी जुही चावला जामिनदार असणार आहे. ज्या अटी शर्थी न्यायालयाने घातल्या आहेत. त्या अटीनुसार आर्यनला जामिनदाराची गरज भासणार असल्याने काल जुही चावला न्यायालयात पोहचली होती. त्यानंतर आर्यन खान लवकरच तुरुंगाच्या बाहेर येऊ शकतो. आर्यनच्या सुटकेबाबत जुहीने आनंद देखील व्यक्त केला आहे.
जुही म्हणाली, ‘हे सगळं संपलं यासाठी मी फार आनंदित आहे. सगळ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. आता आर्यन घरी येणार आहे.’ दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला.या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- विंडीजचे आव्हान कायम; बांगलादेशवर रोमहर्षक विजय
- इंग्लंड-ऑस्ट्रेलियात आज तोडीचा सामना; सलग तिसऱ्या विजयासाठी लढत
- पाकिस्तानचा सलग तिसरा विजय; अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’


