Share

अटकेनंतरही हिना पांचालला आई आणि बहिणीचा पाठिंबा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या प्रकरणाबाबत पोलिसांनी एका पार्टीवर छापा टाकला आणि २२ जणांना ताब्यात घेतले होते. या २२ जणांमध्ये कलाकार आणि नृत्यदिग्दर्शकांचा देखील समावेश आहे. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्टीमधून पोलिसांनी ड्रग्ज आणि काही पैसेही जप्त केले. विशेष म्हणजे या पार्टीत मराठी चित्रपट ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचालचाही समावेश होता. यामुळे तिला अटक करण्यात आली यावर तिच्या आई व बहिणेने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावर हिनाच्या बहीण म्हणाली की, हिनाने काही चुकीचं केलेलं नाही.  आम्ही हीना बद्दलच्या बातम्या वाचल्या. अनेकांना अटक झाली. पण फक्त हिनाचं नाव हायलाइट करण्यात आलं. मी फक्त इतकंच म्हणेल की, जे माझ्या बहिणीला ओळखतात, त्यांनी यावर विश्वास ठेऊ नका. सध्या आम्ही हिनाला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगत तिने हिनाला पाठिंबा दर्शवला आहे.

तर दुसरीकडे हिनाच्या आईने सांगितले की, ‘हिना असं करू शकत नाही कारण ती तशी नाही. हिनाबद्दल नको त्या गोष्टी ऐकून आम्हाला धक्काच बसला. तिच्या वडिलांची तर तब्येत बिघडली आहे.’

‘बिग बॉस मराठी’मध्ये हीना पांचाळ शोच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ट एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. हीना पांचाळनं हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिनं ‘आयटम साँग’ केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!