Share

वहिनी कतरिना सनी कौशलचा फोटो पाहून झाली फिदा, कमेंट करत म्हणाली…

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Bollywood actress Katrina Kaif) अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न बंधनात अडकली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो प्रंचड व्हायरल झाले. त्यानंतर वहिनी कतरिना आणि विकीचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) यांचं नात देखील उत्तम असल्याचं दिसून येतं. नुकतच कतरिनाने सनीच्या स्टाईलिश फोटोवर केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधत आहे.

दरम्यान विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सनीने आधुनिक स्टाईलमध्ये एथनिक आउटफिट कॅरी केला आहे. या लूकमध्ये सनी कौशलनं मॅचिंग चुडीदार, स्लीवलेस जॅकेट आणि मोजेक प्रिंट स्टोलसोबत एसिमेट्रिकल हेमलाइन कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘एका राजासारखा रुबाब आणि योद्ध्याप्रमाणे पोषाख.’ सनी कौशलच्या या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र या फोटोवर त्याची ‘परजाईजी’ अर्थात वहिनी कतरिनानं कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा होऊ लागली आहे.

https://www.instagram.com/p/CYRHeuooHqj/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोवर कमेंट करताना कतरिनानं लिहिलं, ‘वाइब है, वाइब है’ (‘Vibe hai, Vibe hai’) सनीनं विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नासाठी या लूकची निवड केली होती. या लूकमध्ये तो खूप सुंदर दिसत आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लग्नांपैकी एक विकी आणि कतरिनाचं यांचं लग्न सोहळा ९ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. विकी आणि कतरिनाच्या लग्नानंतर सनीनं त्यांचा फोटो शेअर करताना ‘आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत ‘परजाईजी’ असं म्हणत कतरिनाचं स्वागत केलं होतं.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!