Share

रोमँटिक सीनसाठी अभिषेक घेतो का ऐश्वर्याचा सल्ला?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) बॉलिवूड लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. लग्नाआधी अभिषेक आणि ऐश्वर्यानं त्यांच्या सह- कलाकारांसोबत अनेक रोमँटिक सीन दिले आहेत. मात्र लग्नानंतर ऐश्वर्या, कधी रोमँटिक सीनसाठी (romantic scenes) काही सल्ला देते का असा प्रश्न अभिषेकाला एका शोमध्ये विचारण्यात आला होता.

दरम्यान अभिषेकनं ‘द बिग बुल’ या त्याच्या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (‘The Kapil Sharma Show’ )हजेरी लावली होती. त्यावेळी कपिलनं त्याला चित्रपटातील रोमँटिक सीनबाबत हा प्रश्न विचारला होता. कपिल (Kapil Sharma) म्हणाला, ‘ऐश्वर्या मॅडम तुमची बायको आहे आणि बायको एक चांगली परीक्षकही असते. तु आणखी चांगलं करू शकला असतास किंवा हे जरा जास्तच झालं आहे. असं त्या कधी बोलल्या आहेत का?’

कपिलचा प्रश्न ऐकून सुरुवातीला अभिषेक हसतो आणि मग म्हणतो, ‘मला एक सांग तू तुझ्या बायकोला कधी तुझा शो दाखवतोस का? तर तिने कधी तुला हे सांगितलं आहे का तू निकितासोबत आणखी चांगलं फ्लर्ट करू शकला असतास.’ अभिषेकच्या प्रश्नावर कपिलची बोलती बंद झाली. अभिषेक म्हणतो, ‘तू कधी तुझा शो तिला दाखवत नसशील ना? तसंच मी सुद्धा ऐश्वर्याला माझे चित्रपट दाखवत नाही. याच कारणामुळे की बायको कधीच अशाप्रकारचा सल्ला देत नाही.’ अभिषेकच्या बोलण्यावर कपिल शर्माचा चेहरा पाहण्यालायक झाला होता.

https://www.instagram.com/p/CNSpSMRo5r6/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा अभिषेक बच्चनला विचारत आहे की, चित्रपटातील रोमँटिक सीनसाठी पत्नी ऐश्वर्या राय बच्चन काय सल्ला देते? यावर अभिषेकने कपिलचे बोलणे बंद झाल्याचे उत्तर दिले. अभिषेक- ऐश्वर्या यांच्या लग्नाला आता जवळपास १५ वर्षं झाली आहे. चित्रपट ‘गुरू’ सेटवर सुरू झालेल्या प्रेमाची गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे बॉलीवूडमधील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!