Share

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

पुणे: ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं. असे वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे. याबाबतच उपमुख्यमंत्री अजित(Ajit Pawar ) पवार यांना विचारले असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात कोण काय म्हटले याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला. असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे. आमची इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीबद्दलचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय निवडणुका घेण्यातच येऊ नये. त्याही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तशापद्धतीने आम्ही ठरावही केला. ज्या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये देखील हा मुद्दा पुढे आला आहे. इतर राज्यांमध्ये देखील अशाप्रकारचे मुद्दे येत आहेत. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे तो सगळीकडेच लागू होत असतो. त्यामुळे यात कुठलंही राजकारण आणू नये. असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!