🕒 1 min read
सातारा : आज(४ जाने.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(Shivendraraje Bhosle) यांनी पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून त्यांना आम्ही बंधन घालू शकत नाही, परंतु नगर विकास आघाडी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असे स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलत असतांना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की,’सातारा पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार आहोत.’ तसेच पुढे राष्ट्रवादीकडून पॅनेलसाठी सुरु असणाऱ्या प्रयत्नांविषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले,शिवसेना,भाजप,आरपीआय कोणीही असुद्या ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी ती लढवावी. आम्ही आमच्यापरीने तयार आहोत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र येतील या चर्चांसंदर्भात बोलत असतांना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की,’जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही बिनविरोध झालो असलो तरी, माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला असता तरी माझी निवडणूक लढण्याची तयारी होती. मी कोणाचीही विनंती करायला, तसेच कोणाच्या पायऱ्या झिजवायला गेलो नव्हतो’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- “नितीन गडकरींनी विनंती केली तर…”; अब्दुल सत्तारांचे भाजप-शिवसेना युतीचे संकेत
- रूग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल- किशोरी पेडणेकर
- सावधान! औरंगाबादच्या उड्डाणपूलांवर डांबराचे अधिक थर; मधोमध मोठी भेग, पूल कधीही कोसळण्याची शक्यता!
- राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थावर’ कोरोनाचा शिरकाव
- “कोहलीला सचिन तेंडुलकरच्या मार्गाने जाण्याची गरज नाही, कारण…”; माजी क्रिकेटपटूचे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
