Share

जळगाव महामार्ग चौपदरीकरण समस्यांबाबत अब्दुल सत्तारांनी घेतली नितीन गडकरींची ‘विशेष भेट’.!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणीची सोडवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी मंगळवारी (दि.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान सिल्लोड शहर, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ व जिल्ह्यातील केंद्र सरकार अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासह नवीन रस्ते, रस्त्यात सुशोभीकरण व विद्युत रोषणाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे(Kishor Balande) देखील उपस्थित होते.

या भेटीदरम्यान हर्सूल येथे वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे, अजिंठा घाटाचे चौपदरीकरण करणे, फर्दापूर व अजिंठा गाव पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने या रस्त्यावर सुशोभिकरण करणे, तसेच सिल्लोड शहरातील सर्वच चौकांचे सुशोभीकरण करणे, सिल्लोड शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जंक्शनवर अंडरपास करणे, मंगरूळ ते भवन नगर परिषद हद्दीपर्यंत इलेक्ट्रिक पोल तसेच दुभाजकांमध्ये झाडे लावून सुशोभिकरण करणे, सर्विस रोडची तरतूद करणे, सिल्लोड शहरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करणे, सिल्लोड नगर परिषदेच्या पाण्याची पाईप लाईन स्थलांतर करण्यासाठी अंदाजपत्रकास मान्यता देण्यात यावी, भोकरदन कडून सिल्लोड शहरात येणारा पिंप्री ते सिल्लोड रस्त्याचे सुशोभीकरण व विद्युतीकरण करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व विकासकामांना सहमती दर्शवीत तत्वतः मान्यता दिली आहे. भेटी दरम्यान हर्सूलच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हर्सूल येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण करणे आवश्यक आहे. नसता येथे उड्डाणपूल बांधल्या शिवाय पर्याय नाही. हर्सूल येथील पुरातन नहरी, अंबरी व कब्रस्तानचा विचार करता गावातील नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास साथ द्यावी. तसेच येथील उड्डाणपूल जर टाळायचा असेल तर हर्सूल येथे रस्ता चौपदरीकरण कामासाठी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी हर्सूल गावकऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी चौपदरीकरण कामासाठी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याची सहमती दर्शविली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!