🕒 1 min read
इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले.
न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
https://www.instagram.com/p/CQ8LBwaDU50/?utm_source=ig_web_copy_link
दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुट्टीच आनंद घेताना दिसत आहेत. यातच संघातील मोहम्मद सिराज मात्र मिळालेल्या वेळात जोरदार सराव करताना दिसत आहे. त्याच्या सरावाचा व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी मिळली नसली तरी देखील तो निराश न होता इंग्लंड विरुद्धच्या मालीकेत संधी मिळेल या विश्वासाने तो स्राव करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन
- …अन् रैनानं स्वीकारलं कोहलीचं चॅलेंज ; पाहा मजेदार व्हिडीओ
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- निवड समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्याला मुकला
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

