Share

‘उत्तर प्रदेशात तर जनरल डायरचे सरकार आहे’, बाळासाहेब थोरातांचा संताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान रविवारी या आंदोलनाला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागात हिंसक वळण मिळालं. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा यानं आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले आहेत. यानंतर दोषींना अटक करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पोलिसांशी बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. यावरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही या प्रकरणावरून युपी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘भाजप नेत्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारायला परवानगी आहे. काँग्रेस नेत्यांना मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांची आणि सहकाऱ्यांची भेट घ्यायला परवानगी नाही. प्रियंका गांधी आणि दिपेंदर हुड्डा यांना अडवून, धक्काबुक्की करून ताब्यात घेणारे जनरल डायर सरकार उत्तर प्रदेशात आहे’ असे म्हणत थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रियंका गांधींना सोडा अन्यथा राज्यभर जेलभरो
उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियंका गांधी यांना सोडावेच लागेल, जर त्यांनी प्रियंका गांधींना सोडलं नाही तर आम्ही राज्यभर जेलभरो आंदोलन करु. भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण वारंवार समोर येत आहे. महाराष्ट्रात वारंवार ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, समुद्री वादळ अशी संकटे येत आहेत. यात केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे राज्यांना मदत द्यावी लागते, मात्र भाजपा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्धवस्थ होताना बघत आहे. त्यावर ते राजकारण करत आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा हिशोब भाजपाकडून घेण्याची वेळ आली आहे. त्यांना किती शेतकऱ्यांचे बलिदान हवे आहे. म्हणून पुढील काळात जेलभरो आंदोलन करू अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!