Share

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यांची चांदी!

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा कहर बघता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन लावले, या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य जनतेला समस्या उद्भवत आहेत. पण अवैध दारू विक्रेत्यांची चांदी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान मागील लॉकडाऊनचा अनुभव पाहता आता प्रत्येक ठिकाणी दारुची अवैध विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. जिल्ह्यात ३० हजार रुपयांच्या दारुची अवैध विक्री करीत असताना पोलीसांनी दोन कार व एक दुचाकी जप्त केली आहे.

धर्माबाद येथील शिवाजी चौकात २१ हजारांची विदेशी दारु घेऊन जाणाऱ्या एका कारला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना २४ मार्च रोजी १२.३० वाजता घडली. धर्माबाद येथील शिवाजी चौकात पोलीस नायक पंडित कल्याणकर यांनी विनापरवाना २१ हजार ६०० रुपये किंमतीची विदेश दारु घेऊन जाणाऱ्या कारला ताब्यात घेतले. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात ९६/२१प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पंडित कल्याणकर करीत आहेत.

भोकर येथील बसस्थानक परिसरात डीएनपी लॉजजवळ २३ मार्च रोजी रात्री ९.५० वाजता यातील नमुद आरोपींनी ४ हजार९९२ रुपयांची देशी दारु एका इंडिका कारमध्ये नेत असताना जमादार ज्ञानेश्वर आनेर व सरोदे यांनी पकडून भोकर पोलीस ठाण्यात १२२/२१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जमादार कारामुंगे अधिक तपास करीत आहेत. नायगाव तालुक्यातील रुई येथे किराणा दुकानासमोर यातील नमुद आरोपींनी विना परवाना ४ हजार ९९२ रुपयांची देशी दारु २४ मार्च रोजी दुचाकीवरुन तस्करी करीत असताना जमादार अशोक घुमे यांनी जप्त केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!