औरंगाबाद : देशासह राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्याअनुषंगाने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार कोरोनाचा पुढील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी तसेच कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यावेळी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुधाकर पाटील, शंकरराव खांडवे, मनोज झंवर, जितेंद्र आरके,रईस पठाण, मुख्याधिकारी सय्यद रफिक,आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या सूचना व नियम लागू केले आहेत.
या सुचानाचे पालन करणे प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे. नाहक होणारी गर्दी टाळून नागरिकांनी हात धुणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे या त्रिसूत्री चे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अब्दुल समीर यांनी केले आहे. तर कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जणजागृती सिल्लोड शहरात नगरपरिषदेतर्फे करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय ? हे बाहेर यायला हवं’
- रोहित शर्माचा पहिल्या टी-२० संघात समावेश नसल्याने संताप; मुंबई इंडियन्सने केलं ‘हे’ ट्विट
- धक्कादायक! लातूरच्या वसतिगृहात तब्बल ८७ विद्यार्थी कोरोनाबाधित
- कारवाईचा अतिरेक नको; राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्या महत्वाच्या सूचना
- ‘रायवाडीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा, अन्यथा आत्मदहन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

