लातूर: संपूर्ण राज्यात सध्या कोरोना बाधित वाढत चालले आहेत. यात लातूर जिल्ह्यात ही कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. येथील ‘एमआयडीसी’तील एका संस्थेच्या वसतिगृहात गेल्या पाच दिवसांत ८७ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे येणाऱ्या काळात रुग्णांची संख्या वाढेल असं चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान, काल जिल्ह्यातील १४६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.
संबंधित वसतिगृहात पाच मार्चला ४१ तर काल गुरुवारी ४४ जणांना कोरोनाची लागण झाली. वसतिगृहात २९७ विद्यार्थी असून २२ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १५२ जण बाधित ठरले आहेत.जिल्ह्यात काल एक हजार ४७ जणांच्या आरटीसीपीसीआर चाचण्या झाल्या. त्यात ८६ तर एक हजार २२३ जणाच्या ॲंटीजेन चाचण्यांतून ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २६ हजार २५० वर गेली असून सध्या ८५३ जणांवर उपचार सुरु आहेत. २४ हजार ६८२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे.
एमआयडीसीतील संबंधित वसतिगृहात सातत्याने विद्यार्थी कोरोना बाधित होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या वसतिगृहाच्या तीन इमारतींचे अधिग्रहण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. महापालिकेने तशी कार्यवाही केली असून एका इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातूरच्या नगरसेवकाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पैसे केले परत
- ‘शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले’
- ‘आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार’ मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा संताप
- दही आरोग्यासह त्वचेसाठीही आरोग्यकारक ; वाचा फायदे
- विश्वासघात हा या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे; पडळकरांचा दांडपट्टा सुरूच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
