मुंबई : राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोना वाढीचे प्रमाण आटोक्यात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने कडक निर्बंध लावण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नको असल्यास कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी आणली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हानिहाय आढावा घेतला.
यावेळी त्यांनी, चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याचे तसेच कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तर, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अतिरेक करू नये असा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
पुढे त्यांनी शहरी भागासाठी देखील महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘ शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन नागरिकांना नियमांचे पालन करण्याचं आवाहन करावं. तसंच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा. ज्यांना होम क्वॉरन्टीन केलं आहे, त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा,’ असे निर्देश देखील सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी सरकारच्या टीव्हीवरील जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत’
- सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का? महावितरणची अनोखी शक्कल
- धक्कादायक! लातूरच्या वसतिगृहात तब्बल ८७ विद्यार्थी कोरोनाबाधित
- एसटी महामंडळाच्या बसेस आता गंगापूरलाही थांबणार
- ‘रायवाडीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा, अन्यथा आत्मदहन’


