Share

रोहित शर्माचा पहिल्या टी-२० संघात समावेश नसल्याने संताप; मुंबई इंडियन्सने केलं ‘हे’ ट्विट

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारताने कसोटी मालिका ३-१ ने आपल्या खिशात घातली होती. आता, भारत आणि इंग्लंड मध्ये टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या टी 20 मालिकेतील सर्व म्हणजेच 5 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये फक्त 50 टक्के क्रिकेट चाहत्यांनाच परवानगी दिली आहे.

दरम्यान, भारताची सुरुवात ही अडखळत झाल्याचं दिसून येत आहे. सलामीवीर के एल राहुल अवघी एक धाव करून माघारी परतला. तर, कर्णधार विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. यानंतर शिखर धवन देखील ४ धावांवर बाद झाला. तर, भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिषभ पंत देखील २१ धावांवर माघारी परतला आहे.

दुसरीकडं, हिटमॅन रोहित शर्मा याचा पहिल्या टी-२० सामन्यात समावेश नसल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने एक ट्विट देखील केलं आहे. यात विराट कोहलीने रोहित शर्मा बद्दल केलेलं वक्तव्य आहे. ‘विराट : रोहित पहिल्या दोन खेळासाठी विश्रांती घेणार आहे.’ असं ट्विट मुंबई इंडियन्सने केलं आहे.

इंग्लंडचा संघ –

इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हीड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.

भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!